देशातले हे आहेत महागडे मुख्यमंत्री


दरवर्षी साधारण एप्रिलपासून मोठ्या कंपन्यांच्या सीईओ, व्यवस्थापकीय संचालक अश्या मोठ्या अधिकाराच्या जागी असलेल्यांना किती पगार वाढ झाली याची चर्चा सुरु होते, बातम्या येऊ लागतात. मात्र आपण ज्या राज्यात राहतो, त्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्या मुख्यमंत्रीपदावरील लोकांच्या पगाराची फारशी चर्चा होत नाही. भारतात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत आणि सर्व मुख्यमंत्र्यांचे वेतन वेगवेगळे आहे याची फारशी माहिती आपल्याला नसते. देशातील सर्वात महागडे आणि सहज परवडणारे मुख्यमंत्री कोण याची माहिती खास आपल्यासाठी.


देशात सर्वाधिक पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आघाडीवर आहेत. त्यांचे वेतन आहे महिना ४ लाख १० हजार रुपये. त्याखालोखाल नंबर आहे तो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा. त्यांच्या पगार आहे महिना ३ लाख ९० हजार रुपये. तीन नंबरवर आहेत उत्तर प्रदेश या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. त्यांना महिन्याला ३ लाख ६५ हजार रुपये वेतन मिळते. त्याखालोखाल प्रगतशील महाराष्ट्र राज्याचा नंबर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३ लाख ४० हजार रु. वेतन मिळते.

देशात सर्वात कमी वेतन घेणारे मुख्यमंत्री आहेत त्रिपुराचे. त्यांना महिना १ लाख ५ हजार रुपये वेतन मिळते. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना १ लाख १० हजार तर मणिपूर मुख्यमंत्र्यांना १ लाख २० हजार रुपये वेतन मिळते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना ३ लाख ३५ हजार रु. पगार मिळतो.

Leave a Comment