फेक न्यूजला लगाम लावण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपने आणले नवीन फीचर


मुंबई : सध्या सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होणारे मेसेज मोठा चिंतेचा विषय ठरत असून मोठा धोका व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजमुळे निर्माण झाला आहे. व्हॉटसअ‍ॅपने आता अशा फेक न्यूजला लगाम लावण्यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. युजरला या फीचरच्या मदतीने संशयास्पद लिंकबाबत पडताळणी करता येणार आहे.

अनेकांना आपले जीव व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे गमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावले आहे. काही उपाय योजना अशा फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहेत का? असा सवाल केंद्र सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्युब, ट्विटर या कंपन्यांना विचारला आहे.

भविष्यातील धोका ओळखून व्हॉट्सअॅपवर अशा फेक न्यूजना नियंत्रणात आणण्यासाठी एक टूल येणार आहे. फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी ‘सस्पिशिअस लिंक डिटेक्शन’ नावाचं फिचर व्हॉट्सअॅप देणार असल्याची माहिती wabetainfo या वेबसाईटने दिली आहे. या नव्या फीचरच्या मदतीनं युजरला व्हॉट्सअॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची चाचपणी करणे शक्य होणार आहे.

युजरला ‘सस्पिशिअस लिंक डिटेक्शन’ फीचरच्या माध्यमातून एखादी लिंक आल्यास ती फेक आहे का? लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? याची खातरजमा व्हॉट्सअपकडून केली जाणार आहे. लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असल्यास लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येणार आहे. हा धोका दुर्लक्ष करत युजरने ही लिंक ओपन केल्यास पुढील सर्व जबाबदारी युजरची असणार आहे. लिंक सुरक्षित असल्यास त्यावर लाल रंग येणार नाही. या नव्या अत्यंत उपयुक्त फीचरची चाचणी सध्या सुरू आहे. हे फीचर येत्या काही दिवसांमध्ये युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment