मालमत्तेचा लिलाव करून भारतीय स्टेट बँकेने केली ९६३ कोटींची वसूली


नवी दिल्ली – भारतीय बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडूवून परदेशात पळून केलेल्या विजय माल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव करून ९६३ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती एसबीआयचे सरव्यवस्थापक अरिजित बसू यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना अरिजित बसू म्हणाले की, विजय माल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव करून भारतीय स्टेट बँक ही कर्जवसुली करणार आहे. त्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बँक ही सातत्याने संपर्कात असून ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. माल्ल्याची लंडनमधील संपत्ती जप्त करण्याची परवानगी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, या निकालाने आम्ही खूप आनंदित आहोत. आम्हाला या आदेशामुळे चांगली रक्कम विजय माल्ल्याकडून वसूल करता येणार आहे. विजय माल्ल्याच्या संपत्तीबाबत नियंत्रण व तपासणीस भारतीय बँकांना ब्रिटिश उच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. तसेच पोलीस कारवाई करण्यासही ब्रिटिश अधिकारी मदत करतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Leave a Comment