या आहेत मोदींच्या ताफ्यातील आलिशान गाड्या


भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ह्यांच्यासोबत त्यांच्या गाड्यांचा काफिला नेहमीच दृष्टीस पडतो. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हा गाड्यांचा ताफा सतत त्यांच्यासोबत असतो. ह्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये काही आलिशान गाड्यांचाही समावेश आहे. ह्यामध्ये टोयोटा लँडक्रुझर ही एक अतिशय गतीवान गाडी आहे. पंत प्रधानांच्या शिवाय या गाड्यांचा ताफा इतरही अनेक राजकीय नेत्यांच्या दिमतीला दिला जातो. टोयोटाच्या लँडक्रुझर ह्या गाडीची किंमत एक कोटी रुपये असून, ही गाडी देखील पंतप्रधान आणि इतर राजकीय पाहुण्यांच्या ताफ्यामध्ये नेहमी दिसते.


ह्या आलिशान गाड्यांच्या ताफ्यामध्ये लँडरोव्हर व्होग ह्या गाडीचाही समावेश आहे. या गाडीची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत १.६७ ते २.६७ कोटी रुपये इतकी आहे. पंतप्रधानांच्या ताफ्याशिवाय ही गाडी अनेक बॉलीवूड सुपरस्टार्स सलमान, शाहरुख, आणि शाहिद कपूर ह्यांच्या खासगी वाहनांच्या ताफ्यामध्ये समाविष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी अतिशय बळकट असून, वेळ पडल्यास ह्या गाडीचा उपयोग रुग्नावाहिकेप्रमाणेही केला जाऊ शकतो. पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये समाविष्ट असलेल्या ह्या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बदल केले जाऊन कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी ही गाडी सदैव सज्ज असते.


ह्या गाड्यांशिवाय प्रधानमंत्रींच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, आणि रेंज रोव्हर कंपनीच्या गाड्यांचाही समवेश आहे. ह्या सर्वच गाड्या ह्यांच्या मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेचा सर्वांगीण विचार करून ‘मॉडीफाय’ किंवा सुधारित केल्या गेल्या आहेत. ह्या गाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार अनेक सुधार केले गेले असल्याने ह्या गाड्यांची किंमत आणखीनच वाढली आहे.

Leave a Comment