चिमुकल्या नॅनोच्या या आहेत खासियती


देशातील सर्वात छोटी आणि स्वस्त कार नॅनोचे उत्पादन बंद केले जाणार असल्याचा बातम्या वारंवार येऊ लागल्या आहेत. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची ही ड्रीम कार म्हणून जगात प्रसिद्ध झाली होती. नॅनो खरोखरच आपला निरोप घेणार असेल तर घेओ बापडी. पण तिच्या काही खासियती नेहमीच स्मरणात राहतील. नॅनोची हि खास वैशिष्टे अनेकांना माहिती नाहीत.


नॅनो सुरवातीला जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून बाजारात आली आणि नंतर तिच्या किमती वाढल्या तरी ती नेहमीच चर्चेत राहिली. नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली ती लाँच झाली आणि नंतर तिची अनेक अपडेटेड मॉडेल बाजारात आली. ती लाँच झाली तेव्हाच तिची नोंद जगातील सर्वात छोटी आणि स्वस्त कार म्हणून गिनीज बुक मध्ये घेतली गेली. नॅनोच्या सुरवातीच्या टॉप मॉडेल मध्येही पॉवर स्टीअरिंग नव्हते ते आताच्या नॅनोमध्ये आहे हि तिच्यातील मोठीच सुधारणा आहे.


नॅनोचे बंपर मारुती ८०० पेक्षा छोटे आहे मात्र तरीही यात अधिक जागा आहे. गाडीच्या चाकांना तीनच बोल्ट आहेत, अन्य कारमध्ये ते चार असतात. इंधन भरताना बोनट उघडावे लागते. गाडीच्या किमती कमी ठेवता याव्यात म्हणून अनेक ठिकाणी प्लास्टिक आणि अॅडेसीव्हचा वापर केला गेला होता. या कराचे स्पेअर व्हील बोनट मध्येच आहे. या कारला सिंगल वायपर असून संपूर्ण काच या एकाच वायपरने साफ केली जाते. गाडीचा ग्राउंड क्लीअरन्स उत्तम असून तो बोलेरो, स्कोर्पियो इतका आहे. विशेष म्हणजे नॅनोच्या विविध पार्टस साठी ३४ प्रकारची पेटंट घेतली गेली होती.

Leave a Comment