ट्रम्प यांचे निवडणूक झेंडे मेड इन चायना


चीन आणि अमेरिका याच्यातील भडकलेल्या व्यापार युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत असले तरी अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील झेंडे चीनमध्येच तयार केले जाणार आहेत. याचा अर्थ देशाचे हित जपण्यासाठी ट्रम्प यांनी चीनी मालावर अधिक कर लादला असला तरी त्यांचा वैयक्तिक खर्च चीन मधुन झेंडे बनवून घेतल्याने नक्कीच कमी होणार आहे.

ट्रम्प २०२० साली होणार असलेल्या अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीत पुन्हा उतरणार आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. त्याच्या प्रचाराची तयारी सुरु झाली असून निवडणुकात झेंडे हे प्रचाराचे एक महत्वाचे साधन असते. गेल्या निवडणुकीत ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोघासाठी चीन मधील कंपनीनेच झेंडे पुरविले होते. मात्र त्यावेळी चीनी मालावर निर्बंध घातले गेले नव्हते. ट्रम्प यांनी चीनी कारखान्याला झेंड्यांची ऑर्डर दिली असल्यचे अमेरिकन नॅशनल पब्लिक रेडीओ वर सांगितले गेले.

या संदर्भात चीनी कारखाना मालक चीयांग म्हणाले हा व्यापार आहे. आम्ही अमेरिकन सामान खरेदी करतो तसेच ते आमचा माल खरेदी करतात. माझी कार अमेरिकन आहे. त्यामुळे ट्रम्प याच्याकडून आम्हाला झेंडे बनविण्याचे काम मिळाले यात विशेष नाही. हा व्यापाराचा एक भाग आहे.

Leave a Comment