स्मरणरंजन करेल फियाटची लिमिटेड एडिशन कार


फियाट लवकरच लेटेस्ट कार सादर करत असून हि लिमिटेड एडिशन कार आहे. ५०० स्पियागीना ५८ या स्पेशल सिरीजची हि कार सादर करण्यात एका दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत. एक म्हणजे कंपनीचा वर्धापन दिन आणि दुसरे म्हणजे ५०० स्पिगीयाना मॉडेलचा ६० वा वाढदिवस. लॅव्हीश आउटफिट आणि अल्ट्राचिक डिझाईन ही या खास मॉडेलची वैशिष्टे आहेत.

या कारचा लुक विंटेज कार प्रमाणे आहे. तिला खालच्या बाजूला पांढरा तर बाकी निळा रंग दिला गेला असून क्रोम्ड डोअर मिरर कॅप, साईड मोल्डिंग मध्ये ५०० चा लोगो, रिअर मध्ये लेटेस्ट फियाट क्रिएशन साईन, विंटेज लोगो, क्रोम्द स्पियागीना ५८ नाव असेल. कारला १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन, मोल्ड सीट्स, ७ इंची एचडी लाइव्ह टच स्क्रीन रेडीओ, सीट बॅक पॉकेट, रिअर पार्किंग सेन्सर, अॅपल, अँड्राईड कार प्ले, ऑटो एसी, नेव्हिगेटर अशी अन्य फिचर दिली गेली आहेत.

Leave a Comment