रॉयल इंडियनची ‘बुलेट’ १ लीटरमध्ये ९० किमी धावणार


नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक शहरात रॉयल एनफील्डच्या बुलेटचा दणदणीत आवाज ऐकू येतो. बुलेट सवारी करण्याची इच्छा प्रत्येक बायकरला असतेच. पण तिची जास्त किंमत आणि कमी मायलेजमुळे प्रत्येकालाच बुलेट घेणे परवडेबल नाही आणि त्यांचे बुलेटचे स्वप्न हे स्वप्नच राहते. पण तुमच्या घरात आणि गल्लीतही आता बुलेटचा आवाज येऊ शकतो. यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजायचीही गरज नाही आणि या बुलेटवर घेऊन फिरताना मायलेजबद्दल विचार करण्याचीही गरज नाही.

६० ते ७० हजारांपर्यंत किंमत असलेली बुलेट ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आली असून या बाईकचीही किंमत दुसऱ्या बाईक प्रमाणेच आहे. त्याचबरोबर ही बुलेट १ लीटर पेट्रोलमध्ये ९० किमी धावते. रॉयल एनफील्डने या बुलेटला बनवलेले नाही. ही बाईक रॉयल एनफील्डशी मिळते जुळते नाव असलेल्या रॉयल इंडियनने बनवली आहे. बुलेटशी मिळता जुळता या बाईकचा लूक आणि आवाज आहे.

ही बुलेट भुवनेश्वरमधील बाईक बिल्डर रॉयल उडोने बनवली आहे. ही गाडी दिसायला बुलेटसारखीच आहे. पण यामध्ये १०० सीसी इंजिन देण्यात आले आहे. या गाडीचे नाव बोल्ट असे ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment