आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड होणार पोलिसमामा


मुंबई : आपल्या देशात व्हॉट्सअॅप न वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी फारच कमी असेल. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर अनेक ग्रुप असतात. व्हॉट्सअॅपवर शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे असे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप आहेत. पण आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोलिसमामा अॅड होणार आहेत.

महाराष्ट्रात गाजर गवतासारखे अफवांचे पीक पसरले आणि त्याला व्हॉट्सअॅपवरुन पसरणारे अविचारी फॉरवर्ड्स कारण ठरले आहेत. एका सेकंदात कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड होतो. पण त्याचे परिणाम काय होतील याचा कुणीही विचार करत नाही. म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांनी आता शक्कल लढवली आहे. महाराष्ट्रातील सव्वादोन लाख आणि मुंबईतील ५० हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता आपल्या ग्रुपमध्ये पोलिसच असल्यानंतर अॅडमिनपासून मेबर्सवर करडी नजर राहणार आहे आणि जो अफवा पसरवेल त्याची आता खैर नाही. १५० कोटींच्या घरात जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या आहे. त्यातील तब्बल 20 कोटी ग्राहक हे एकट्या भारतात आहेत.

Leave a Comment