भारत तिबेट सीमेवरची दुर्गम गर्तान्ग गल्ली पर्यटकांसाठी खुली


गेली ५६ वर्षे सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली गेलेली भारत चीन आणि तिबेट सीमेवरील अत्यंत दुर्गम अशी गर्तान्ग गल्ली पुन्हा खुली केली गेली आहे. साहसी आणि निसर्ग पर्यटनप्रेमीना त्यामुळे आणखी एक अनोखे आणि रोमांचकारी पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे.

१९६२ पूर्वी हा तिबेट आणि भारत याच्यामाधला व्यापारी मार्ग होता. मात्र ६२ च्या भारत चीन युद्धानंतर हा मार्ग सुरक्षा आणि सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने बंद केला गेला. गंगोत्रीपासून ११ किमी पूर्व भैरो घाटी पासून जाड गंगा किनाऱ्यावरून हा रस्ता जातो. तिबेट या मार्गाने आणखी जवळ पडते. १४० वर्षे समुद्रसपाटीपासून ११ हजार फुट उंचीवर असलेल्या खड्या पहाडात १५० मीटर लांबीचा एक लाकडी पूल आजही आहे. मात्र या पुलावरून घोडे, खेचरे जाऊ शकत नसत म्हणून खडक फोडून येथे निमुळता रस्ता तयार केला गेला . हा रस्ता छोटा आहे पण त्यामुळे तिबेट भारतातील व्यापार वाढीला मोठा हातभार लागला होता.


या रस्त्याने तिबेटमधून उत्तरकाशी येथे दरवर्षी भरणाऱ्या माघी जत्रेत व्यापारी गरम कपडे घेऊन येत आणि हे कापडे विकून त्यातून तेल, मीठ, साखर, गुळ अश्या वस्तू तिबेटमध्ये नेत असत. साहसी पर्यटनाची आवड असलेल्यांना आता आपल्या व्यापारी पूर्वजांनी तुडविलेले हा अवघड रस्ता पायाखाली घालता येणार आहे.

Leave a Comment