बिकिनी झाली ७२ वर्षांची


वय वाढले तरी म्हातारपण न येणाऱ्या काही चीजा जगात आहेत. या चीजा वय वाढेल तश्या अधिक तरुण होत जातात. त्यात अग्रणी आहे महिला वापरतात ती बिकिनी. हि बिकिनी प्रथम घातली गेली ती ५ जुलै १९४६ या दिवशी. म्हणजे हि बिकिनी आता ७२ वर्षांची झाली पण तिची क्रेझ आणि हॉटनेस वाढत गेला हे सत्य. पूर्वी स्विमिंग पूल पुरती मर्यादित असलेली ही आरामदायी बिकिनी आता खेळ मैदान तसेच सौंदर्य स्पर्धात मधूनही मोठ्या दिमाखाने मिरविली जात आहे.

बिकीनीचा इतिहास सांगतो कि फ्रेंच इंजिनिअर लुइस रिचर्ड हा बिकीनीचा जन्मदाता. त्याने सर्वप्रथम बिकिनी बनविली आणि त्याला बिकिनी अॅटॉल असे नाव दिले. अॅटॉल हे त्याकाळी अणुचाचण्या जेथे केल्या गेल्या त्या जागेचे नाव होते. लुइस ला बिकिनी सादर करण्यासाठी एका मॉडेलची गरज होती. त्यावेळी पॅरीस मधील मॉडेल मिशेलिन बर्नाडीनो हिने हे आव्हान स्वीकारले आणि बिकिनी परिधान केली तो दिवस होता ५ जुलै.


मिशेलिनने हि बिकिनी घातली मात्र ती वृत्तपात्रांची हेडलाईनची बातमी झाली. विशेष म्हणजे पुरुषवर्गाला बिकिनी फारच भावली आणि मिशेलिनला ५० हजार प्रशंसकांची पत्रे आली. तत्पूर्वी डिझायनर हेम याने तयार केलेला छोटा बेदिंग सूट वापरत होता पण बिकिनी त्यापेक्षाही छोटी असल्याने पाहतापाहता लोकप्रिय झाली. सुरवातीला इटली सह अनेक देशांनी बिकिनीवर बंदी घातली होती मात्र १९५० ते ६० या दरम्यान हि बंदी उठविली गेली. आता बिकिनी हा फॅशन आयकॉन बनला असून बिकिनी फोटो शूट करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. स्विमिंग पूल पासून सुरवात करून बिकीनीचा प्रवास आता जागतिक सौदर्य स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे.

Leave a Comment