गुगल भारतभर देणार मोफत वायफाय


भारतातील ४०० रेल्वे स्थानकांवर रेलटेलच्या सहकार्याने मोफत वायफाय सेवा देण्याची कामगिरी यशस्वी केल्यानंतर आता गुगळे भारतात सर्वत्र मोफत वायफाय देणार असून जागोजागी उभारल्या जाणाऱ्या हॉटस्पॉट मुळे सुमारे ४ कोटी नवे युजर जोडले जाणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी झाला तर भारताच्या अर्थव्यवस्थेत १.३६ लाख कोटी रुपयांची वाढ होणार आहे असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुगल त्यांच्या नव्या वायफाय व्हिजन मध्ये पूर्ण भारत कव्हर करणार आहे. या मुळे किमान १० कोटी नवे स्मार्टफोन युजर जोडले जातील. इतक्या मोठ्या संख्येने जोडल्या जाणाऱ्या या युजरने नवे स्मार्टफोन खरेदी केले तर भारताच्या जीडीपी मध्ये २० दशलक्ष डॉलर्सनि व्हाध होईल. गुगल हा उपक्रम भारत सरकारच्या नियमानुसार राबविणार आहे. त्यानुसार २०२० पर्यंत ५० लाख तर २०२२ पर्यंत १ कोटी नवीन अॅकसेस पॉइंट लावावे लागणार आहेत. त्यासाठी गुगल विविध इंटरनेट सेवा पुरवठादार आणि संस्थांबरोबर भागीदारी करणार आहे.

Leave a Comment