खुल्या वातावरणातील हवा शुद्ध करणार हे मशीन


वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सध्या जगभरातील सर्व देशांना भेडसावतो आहे. हवा शुद्ध करणारी यंत्रणा घरात किंवा कार अथवा बंदिस्त जागी वापरणे शक्य असले तरी सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बाजार अश्या ठिकाणी या यंत्रांचा वापर शक्य होत नाही. मात्र अश्या ठिकाणी हवेतील विषारी तसेच प्रदूषण करणारे वायू शोषून घेणारे मशीन आता उपलब्ध झाले आहे. कोपनहेगन विश्वविद्यालयातील वायुमंडळ रसायन विभागाचे प्रोफेसर जॉन मॅथ्युज यांनी हे मशीन तयार केले आहे.

३० मीटरच्या व्यास असलेले हे गोलाकार मशीन वरून पूर्णपणे उघडे आहे. त्याच्या चारी बाजूनी उच्च दर्जाचे फिल्टर लावले गेले आहेत. हे फिल्टर हवेतील धोकादायक वायू खेचून घेतात. या मशिनच्या आत बसलेल्यांना शुद्ध हवा मिळते तशीच मशिनच्या बाहेर असलेल्यानाही शुद्ध हवा मिळते. शिवाय हे मशीन प्रदूषणाचे प्रमाण कमी करते. हे मशीन मोठ्या इमारतीवर बसविता येते तसेच सार्वजनिक ठिकाणीही बसविता येते.

Leave a Comment