आता व्हॉट्सअॅपचे नवे फिचर रोखणार अफवा


नवी दिल्ली – केंद्र सरकारने अफवा व भडकाऊ संदेश पसरल्यामुळे होणाऱ्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर इशारा दिल्यानंतर त्याचे उत्तर व्हॉट्सअॅपने दिले आहे. कंपनीने म्हटले आहे, की भारतात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना चिंताजनक असून कंपनीकडून त्याच्या नियंत्रणासाठी ठोस पाऊस उचलले जाईल. याबाबत व्हॉट्सअॅपने सांगितले, की भारतासाठी एका नव्या फीचरची चाचणी आम्ही करत आहोत. यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये मेसेज आल्यानंतर समजू शकेल, की हा मेसेज सेंडरने लिहिला आहे, की अफवा पसरवण्याच्या उद्देश्याने फॉरवर्ड केला आहे. लवकरच हे फीचर लाँच केले जाईल.

मंगळवारी व्हॉट्सअॅपला माहिती व प्रसारण मंत्रालयाने इशारा दिला होता, की हिंसेचे कारण बनणाऱ्या संदेशांना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करा. कंपनीला सरकारने सांगितले होते, की जबाबदारीपासून तुम्ही दूर नाही जाऊ शकत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते, की हिंसक घटना गुन्हा असून कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. न्यायालयाने हे सुद्धा म्हटले होते, की अशा प्रकारच्या घटनांना रोखण्याची जबाबदारी राज्या सरकारांची आहे.

दरम्यान कंपनीने म्हटले, की लोकांची चिंता आम्हाला असून आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊनच अॅप डिझाईन केले होते. त्याची माहिती लोकांना दिली जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील. व्हॉट्सअॅपचा गैरवापर रोखण्यासंबंधीही आम्ही आमच्यापरीने काम केले. आम्ही प्रॉडक्ट कंट्रोल, डिजिटल लिट्रेसी, फॅक्ट चेकिंग अॅडव्होकेसी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाय केले.

Leave a Comment