केवळ तेल आयात करणाऱ्या देशांशीच व्यापार करणार इराण


तेहरान (इराण) – इराणने अमेरिकेच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर एक योजना आखली असून इराणमधून जे देश तेल आयात करतील, त्याच देशांपासून फक्त वस्तू खरेदी करणार असल्याची योजना इराण अमलात आणण्याच्या तयारीत आहे.

आमची तेलाच्या निर्यातीसाठी वस्तूविनिमय पद्धत वापरण्याची योजना आहे. तुम्ही आमच्या देशातील तेल खरेदी करणार असाल तरच तुमच्या इतर वस्तू आम्ही खरेदी करु, असे संबंधित देशांना आणि बाजारपेठांना सांगितले असल्याचे इराणच्या संसदेतील ऊर्जा समितीचे प्रतिनिधी असदुल्लाह कारीखानी यांनी स्पष्ट केले. त्यांनी या योजनेवर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन केल्याचेही सांगितले.

ट्रम्प प्रशासन मित्र राष्ट्रांवर इराणला दिला जाणारा निधी थांबवण्याबाबत दबाव बनवत असल्याचे इराणने ही योजना आखली आहे. इराणशी असलेला तेल व्यापार थांबवण्यास अमेरिकेने इतर देशांना सांगितले आहे. नोव्हेंबरपर्यंत असे न केल्यास प्रतिबंधांना अडचणीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

Leave a Comment