वॉलमार्टचे वॉल्टन कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत परिवार


ब्लूमबर्गने जगातील २५ सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिक घराण्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यात वॉलमार्टचे वॉल्टन कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे. या परिवाराची संपत्ती १५१ अब्ज डॉलर्स म्हणजे १०.३३ लाख कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे इतका प्रचंड पैसा असूनही हे कुटुंब अमेरिकेच्या नॉर्थवेस्ट अर्कान्सास भागात एका कसब्यात वास्तव्यास आहे. या यादीत भारतातील मुकेश अंबानी परिवार ७ व्या क्रमांकावर आहे.

या यादीत दोन नंबरवर कोच ब्रदर्स आहेत. त्याची कोच इंडस्ट्री प्रसिद्ध असून हे चार भाऊ तेल शुद्धीकरण व्यवसायात आहेत. त्यातील दोनच सध्या हा व्यवसाय पाहतात. त्यांची संपत्ती आहे ६.७३ लाख कोटी. मार्स कंपनीचे मार्स कुटुंब तीन नंबरवर असून त्यांचा मिल्कीवे अँड मार्स बारचा व्यवसाय आहे. यातून त्यांना ३५ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळतो. त्यांची सम्पती आहे ६.११ लाख कोटी. हि कंपनी १९११ साली स्थापन झाली आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर वॅनडॅम डी मेविल्स अँड डी स्पोएलबर्च एनह्युजर हे कुटुंब असून त्याच्च्या बृएरिजची उलाढाल प्रचंड आहे. तीन परिवारांनी हि कंपनी सुरु केली असून त्यांची संपत्ती आहे ३.६९ लाख कोटी. १४ व्या शतकापासून हा व्यवसाय सुरु आहे. या यादीत ५ नंबरवर ड्यूमस कुटुंब असून त्यांचा रायडींग गिअर बनविण्याचा व्यवसाय आहे. हर्मज असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.

या यादीत रिलायंसचे मुकेश अंबानी परिवार ७ व्या स्थानावर आहे. धीरूभाई अंबानी यांनी १९५७ साली व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रो, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात हि कंपनी व्यवसाय करते.

Leave a Comment