‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये हे आहेत अडवाणी, शिवराज पाटील आणि लालू यादव !


ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे संजय बारुआ यांच्या पुस्तकावर आधारित बनत असलेल्या ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका साकारत असून खऱ्या खुऱ्या राजकारणातील व्यक्ती या राजकीय विषयावरील चित्रपटात झळकणार आहेत. जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेर्ट या चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका साकारत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच झळकली आहे. आता यांनी सोशल मीडियावर इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिका कोण करीत आहेत याची माहिती खेर दिली आहे.

अवतार साहनी हा अभिनेता ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटात लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका साकारणार आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या भूमिकेत विमल वर्मा आणि शिवराज पाटील यांच्य़ा भूमिकेत अनिल रस्तोगी झळकणार आहेत.


मनमोहन सिंगांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत, तर मनमोहन सिंगांची पत्नी गुरशरण कौर यांच्या भूमिकेत दिव्या सेठ दिसतील. राम अवतार भारद्वाज हे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयींच्या भूमिकेत दिसतील. अर्जुन माथूर हे राहुल गांधींच्या भूमिकेत तर अहना कुमरा या प्रियंका गांधींच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय गुत्ते करीत असून अक्षय खन्नाचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.