स्मार्टफोन साठी एअरबॅग तयार


स्मार्टफोन साठी कव्हर ही आता नवलाची गोष्ट राहिलेली नाही. स्मार्टफोन खराब होऊ नये म्हणून गार्ड लावणे, स्क्रॅच प्रुफ कव्हर लावणे किंवा अगदी स्मार्टफोनचा विमा उतरविणे असे प्रकारही आता रुळले आहेत. लोकांची स्मार्टफोनची क्रेझ वाढते आहे तसेच महागडे फोन खरेदी करण्याकडे युजरचा वाढता कल आहे. असे महागडे फोन जिवापेक्षा जास्त जपले जातात. चुकून फोन हातातून निसटला तरी जीवाची घालमेल होते. हि घालमेल होऊ नये आणि हातातून जमिनीवर आदळला तरी स्मार्टफोन इंटॅक्ट राहील असे एक कव्हर किंवा एअरबॅग जर्मनीचा आलेन विद्यापीठ मधील फिलीप फ्रेन्जेलने या विद्यार्थ्याने बनविली आहे.

हे एक प्रकारचे स्मार्टफोन कव्हरच आहे. ते सर्वसामान्य कव्हरप्रमाणेच दिसते. मात्र हे कव्हर घातलेला स्मार्टफोन हातातून निसटून जमिनीवर पडला कि कव्हरचा आतले अॅबझॉरबर चारी कोपर्यातून बाहेर येतात आणि फोन जमिनीवर आदळण्यापासून बचावतो. यामुळे फोनची मोडतोड होत नाही आणि नुकसान टाळते. द. टेलिग्राफ मध्ये हि माहिती दिली गेली आहे.

Leave a Comment