रॉयल एन्फिल्ड इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात येणार


देशात टॉप १० बाईकमध्ये अग्रणी असलेली देशी कंपनी रॉयल एन्फिल्ड प्रदूषण आणि इंधन समस्या लक्षात घेऊन इलेक्ट्रिक बाईक बनवीत असून इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात कंपनीचा प्रवेश विक्रीत वाढ होण्यास मदतगार ठरेल असे कंपनीचे म्हणणे आहे. भारतात सर्वात दमदार आणि शानदार बाईक म्हणून रॉयल एन्फिल्डच्या बाईक लोकप्रिय आहेत. त्यांची इलेक्ट्रिक बाईकही अशीच दमदार असेल असा कंपनीचा दावा आहे.

इलेक्ट्रिक बाईक या परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील आणि त्या पर्यावरणस्नेही असतील असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या क्लासिक ३५० मॉडेलला देशात सध्या सर्वाधिक पसंती आहे. या बाईकला ३४६ सीसीचे इंजिन असून तिची किंमत आहे १.५ लाख. या बाईकचे मायलेज लिटरला ३७ किमी इतकेच असूनही ती लोकप्रिय ठरली आहे. इलेक्ट्रिक मॉडेल तेवढ्याच पॉवरमध्ये येईल पण ते अधिक मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment