येतोय ९ कॅमेरे असलेला स्मार्टफोन


अमेरिकन लाईट कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनचा प्रोटोटाईप तयार केला असून या फोनला एक दोन नाही तर चक्क ९ कॅमेरे असणार आहेत. लाईट कंपनी मल्टीसेन्सरचे कॅमेरा सेटअप तयार करते आणि याचा वापर स्मार्टफोनमध्ये केला जातो. हि कंपनी स्मार्टफोन उत्पादनही करते.

९ कॅमेरे असलेला हँडसेट तयार केल्याचा दावा कंपनीने केला असून यामुळे युजर ६४ एमपीचे फोटो क्लिक करू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. मिडिया रिपोर्ट नुसार कंपनीच्या हँडसेटमधला प्रत्येक कॅमेरा त्याचा फोकस एका ओब्जेक्टवर ठेवतो आणि या सर्व कॅमेरयातून काढलेले फोटो प्रोसेसर एकत्र करतो आणि त्यातून ऑब्जेक्टची स्वच्छ, स्पष्ट आणि उत्तम दर्जाची प्रतिमा मिळते. यात फोटो ब्लर करण्याचे ऑप्शन दिले गेले आहे.

Leave a Comment