जिओनेही दिली नाही अशी ऑफर व्होडाफोन-आयडिया देणार!


मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेला रिलायन्स जिओने ग्राहकांना फुकट सुविधा देऊन सुरुवात केली होती. आता व्होडाफोन-आयडिया या स्पर्धेमध्ये आणखी पुढे गेले आहे. व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण झाल्यानंतर ही कंपनी देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी होईल. विलीनीकरण झाल्यानंतर व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना अशी ऑफर देऊ शकते जी आत्तापर्यंत जिओनेही दिलेली नाही. जिओ आणि एअरटेलमध्येच आत्तापर्यंत ही स्पर्धा सुरु होती. पण यामध्ये आता व्होडाफोन-आयडियाची भर पडणार आहे.

मार्च २०१९ पर्यंत जिओच्या सुविधा आहेत. व्होडाफोन-आयडियाही जिओप्रमाणेच त्यांच्या ग्राहकांना मेंबरशिप प्लान देऊ शकते. एवढच नाही तर सध्याच्या प्लानच्या किंमतीही कमी होतील. व्होडाफोन-आयडियाच्या विलीनीकरणानंतर किंमती ३० टक्क्यांपर्यंत कमी होतील, अशी माहिती मिळत आहे. याचबरोबर व्हॅल्यू अॅडेड सर्विस म्हणजेच जास्तीच्या सुविधाही ग्राहकांना मिळतील. पोस्टपेड ग्राहकांसाठी बिलावर सूट मिळेल तर प्रिपेड ग्राहकांसाठीही मोठ्या प्लानची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment