विजय माल्ल्याच्या जेटची ३५ कोटीला विक्री


चारवेळा प्रयत्न करूनही अपेक्षित किंमत न मिळालेल्या बँकांना टोपी घालून परदेशात आश्रयास गेलेल्या किंग फिशर विमान कंपनीचा मालक विजय मल्ल्या याच्या लग्झरी जेट ला अखेर लिलावात ३५ कोटी रु.किंमत मिळाली आहे. शुक्रवारी झालेल्या या लिलावात फ्लोरिडाच्या अॅव्हीएशन व्यवस्थापन कंपनीने या विमानासाठी सर्वाधिक ३४.८ कोटी रु.ची बोली लावली. सेवा कर विभागाने हा लिलाव केला.

या ए ३१९ जेट मधून मल्ल्या विदेशात व्यवसायानिमित्त प्रवास करत असे. आक्टोबरमध्ये किंग फिशर दिवाळखोर होण्याची घोषणा होण्यापूर्वी माल्ल्यावर ८०० कोटी सेवा कर न भरल्याची नोटीस दिली गेली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी ई ऑक्शन ला परवानगी दिली होती. २०१३ पासून हे विमान मुंबई विमानतळावर खडे असून आता मुंबई उच्च न्यायालाच्या परवानगीनंतर हा सौदा पूर्ण होणार आहे असे समजते.

Leave a Comment