चांगली सेवा न पुरवल्याने जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोनला लाखोंचा दंड


मुंबई : दूरसंचार नियमन ट्रायने देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांना दंड ठोठावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबरपासून ३ महिने चांगली सेवा न पुरवल्याने दंड ट्रायने हे पाऊल उचलले आहे. जवळपास ३१ लाख रुपयांचा दंड रिलायन्स जिओला ठोठावला आहे. हा दंड कॉल सेंटर आणि ग्राहक सेवा व्यवस्थित न ठेवल्य़ामुळे ठोठावण्यात आला आहे. पण रिलायन्स जिओ कडून अद्याप अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोबतच भारती एअरटेलला देखील २३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयडियाला २९ लाख रुपयांचा तर व्होडाफोनला ९ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत पाठवण्यात आलेल्या इमेलवर आयडिया, व्होडाफोन आणि भारती एअरटेलने देखील कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. इतर कंपन्यांवर देखील दंड ठोठावण्यात आला आहे. ज्याममध्ये एअरसेल आणि बीएसएनएलचा देखील समावेश आहे. ट्राय ने लावलेला दंड हा कंपन्यांच्या विविध सर्कल आणि सेवा क्षेत्रांशी जोडलेला आहे. याबाबत ट्राय चेअरमन आर.एस शर्मा यांनी नुकतीच पुष्टी केली आहे की, डिसेंबरपासून ३ महिन्यांच्या सेवेवर दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांवर आर्थिक कारवाई केली आहे.

Leave a Comment