स्विस बँकेत पैसा भरण्याच्या बाबतीत इंग्लंड आघाडीवर; तर दुसऱ्या स्थानी अमेरिका


ज्यूरिख – इंग्लंड स्विस बँकांत नागरिक आणि कंपन्यांनी पैसे जमा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानी तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. भारत २०१६ मध्ये या यादीत ८८ व्या स्थानावर होता. स्विस नॅशनल बँकेच्या एका अहवालानुसार २०१७ मध्ये स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत ५० टक्क्यांनी वाढ झाली असून ती साधारणपणे ७ हजार कोटींवर पोहोचली आहे. भारताच्या ठेवीत २०१६ मध्ये ४४ टक्क्यांची घट झाली होती.

भारत या यादीत ७३ व्या स्थानावर असून ७२ व्या स्थानावर पाकिस्तान आहे. स्विस बँकांतील पाकिस्तानच्या पैशांत २०१७मध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या या अहवालात हा पैसा ग्राहकांचे देणे असल्याचे दाखवण्यात असल्यामुळे यात किती स्वरुपात कथित काळे धन आहे, हे सिद्ध होत नाही. ही अधिकृत आकडेवारी दर वर्षी स्वीस नॅशनल बँकेकडून जाहीर केली जाते. पण यात भारतीय, अनिवासी भारतीय आणि इतरांकडून इतर देशांतील संस्थांच्या नावे जमा केलेल्या धनाचा समावेश नाही.

Leave a Comment