अंबानी परिवाराची सून वर्षाला कमावते एवढे पैसे


उद्योजक घराण्यात सून म्हणून लवकरच प्रवेश करणारी श्लोका मेहता स्वतः यशस्वी बिझिनेस वूमन असून तिची कमाई वर्षाला ७ कोटींच्या घरात आहे. श्लोका ब्लु इंडिया या हिरा कंपनीचे मालक रसेल यांची मुलगी आहे आणि ब्यू फाउंडेशनची संचालक म्हणून काम करते आहे. त्याचबरोबर ती कनेक्ट फॉर या एनजीओ ची सहसंस्थापक आहे. देशातील सर्वात बडे उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश यांचा साखरपुडा श्लोका मेहता बरोबर काल साजरा झाला आणि त्याला अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्लोकाची नेट वर्थ १८० लाख अमेरिकन डॉलर्स आहे आणि तिला लग्झरी कार्सची खूप आवड आहे. तिच्या संग्रही मिनी कुपर, मर्सेडीस, बेंटली या कार असून तिचे वार्षिक उत्पन आहे ७ कोटी. गेल्याच वर्षी तिने बेंटलीची ४ कोटी रु.किमतीची कार खरेदी केली आहे. तिच्या कमाईट गेल्या काही वर्षात २४ टक्के वाढ झाली असल्याचे सांगितले जाते. रिलायंस जिओची पूर्ण जबाबदारी सांभाळणारे आकाश अंबानी आणि श्लोका शाळेपासूनचे मित्र असून आता ते जीवनसाथी बनत आहेत.

Leave a Comment