पोर्शेची सुपरकार ९११ जीटी २ आरएस १० जुलैला भारतात लाँच


पोर्शेच्या ९११ रेंजमधील सर्वात वेगवान आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली सर्वात महागडी ९११ जीटी २ आरएस सुपरकार मुंबईत १० जुलै रोजी लाँच केली जाणार आहे. हि लिमिटेड एडिशन कार असून जागतिक स्तरावर तिला मोठी मागणी आहे असे सांगितले जात आहे. पोर्शेची हि सर्वात वेगवान सुपरकार आहे.

या कारला ३.८ लिटरची ट्वीन टर्बोचार्ज्ड फ्ल्यॅट सिक्स इंजिन दिले गेले असून ती ० ते १०० किमीचा वेग अवघ्या २.८ सेकंदात घेते. तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी ३४० किमी. कारचे मायलेज लिटरला ८.५ किमी आहे आणि तिला ७ स्पीड गिअरबॉक्स दिली गेली आहे. ऑटो आणि मॅन्यूअल अश्या दोन्ही मोड मध्ये ती वापरता येते.

या कारची किंमत युएस मध्ये ३ लाख डॉलर्स असून भारतात ती साधारण ४ कोटी ला पडेल असा अंदाज आहे. कंपनीची हि पहिलीच जीटी २ कार नाही. यापूर्वी १९९३ मध्ये प्रथम जीटी मॉडेल सादर केले गेले होते त्यानंतर २०१० मध्ये ९११- ९९७ जनरेशन जीटी २ मॉडेल सादर केले गेले होते.

Leave a Comment