हार्मोन्सच्या सेवनामुळे होऊ शकतो तुमच्या डीएनएत बदल


लंडन – कमीत कमी मात्रेत संप्रेरकाचे (हार्मोन्स) केलेले सेवनही जनुकीय अभिव्यक्तीत (डीएनए) बदल करू शकतात. त्याचबरोबर भावी पिढीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. हे डुकरांवर केलेल्या एका प्रयोगात सिद्घ करण्यात आले आहे.

गर्भधारण केलेल्या डुकरांवर एंडोक्राईन डिसरप्टर केमिकल (ईडीसी)चा प्रयोग संशोधकांनी केला. इस्ट्राडोल-१७- बिटा नावाचे नैसर्गिक संप्रेरक (हार्मोन) या मादी डुकराला देण्यात आले होते. बाह्य संप्रेरकांसह शरीराच्या आतील संप्रेरकांवर जसाच्या तसा त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे डुकरांवर जनुकीय बदल झाल्याचे आढळून आले. डुकराच्या गर्भातही संप्रेरकाचा हा परिणाम पाहण्यास मिळाला होता. त्यानंतर जन्मलेला डुक्कर प्रौढावस्थेत आल्यावर तो आढळला. याचे परिणाम सायंटीफिक रिपोर्ट या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत.

स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणाऱ्या अनियमिततेसाठी ईडीसी हे वापरले जाते. मनुष्याद्वारे इस्ट्राडोल ०.०५ मायक्रोग्रॅम प्रति किलो तुलनेत सामान्यतः घेतले जाते. या हार्मोनचे कमीत-कमी सेवनही अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे मत झ्युरीच येथील स्वीस फेडरल तंत्रज्ञान संस्थेच्या प्राध्यापिका सुसेन अलब्रिच यांनी मांडले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment