बीएमडब्ल्यूवर ओढवली नामुष्की; परत मागवणार १४८ कार


बीजिंग – चीनमधील १४८ बीएमडब्ल्यू कार कारच्या इंधन टाकीमध्ये दोष आढळल्यानंतर परत मागवण्यात येणार आहेत. ११८ I सिरीज, १२० I सिरीज आणि १२५ I सिरीज या मॉडेल्सचा यामध्ये समावेश आहे.

९ जून ते १७ जून २०१७ दरम्यान या गाड्या बनवण्यात आल्या होत्या. या गाड्यांचे उत्पादन बीएमडब्ल्यू ब्रिलियंस ऑटोमोबाईल या कंपनीने केले होते. चीनचा हुआचेन ऑटो ग्रुप या कंपनीमध्ये भागीदार आहे. सदोष इंधन टाकीमुळे तेल गळती होऊन गाडीला आग लागू शकते. या गाड्या हा धोका टाळण्यासाठी २३ जुलैपासून परत मागवण्यात येणार आहे. या गाड्यांची तपासणी करुन त्यात नवी इंधन टाकी मोफत बसवण्यात येणार आहे.

Leave a Comment