महालनोबीस यांच्या स्मरणार्थ १२५ रु.नाणे प्रकाशित


महान संख्याशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने १२५ रु.चे विशेष नाणे प्रकाशित केले असून उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू याच्या हस्ते हे नाणे शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. याचबरोबर ५ रु.मूल्याचे नवे नाणेही प्रकाशित झाले आहे.

२००७ सालापासून केंद्र सरकारने २९ जून हा दिवस सांखिकी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या दिवशी सामाजिक आर्थिक योजना व गणना यामध्ये सांख्यिकी शास्त्राचे महत्व अधोरेखित करणे हा उद्देश होता. या शास्त्रात महालनोबीस याचे योगदान फार मोठे आहे. देशात जनगणना तसेच अन्य सर्व्हेक्षणे करणारी संस्था इंडिअन स्टॅटीसटिकल इन्सटीट्युटची स्थापना १९३१ साली झाली आणि ती महालनोबीस यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह केली होती. गुगलनेही महानोलबीस याच्यावर डूडल बनवून त्यांचे स्मरण केले आहे.

Leave a Comment