घाव काही क्षणांतच भरून काढणारे सुपर ‘ग्लू’


कधी पडल्यामुळे किंवा एखाद्या लहानशा अपघातामध्ये शरीरावर लहानसहान घाव होत असतात. काही घाव जरा मोठे असून त्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांवर टाके घालण्याचीही गरज भासते. अश्या वेळी आधी भूल देऊन मग टाके घातले जातात. त्यानंतर घाव सुकून ही जखम भरून आल्यानंतर टाके काढून टाकले जातात. ही टाके घालण्याची प्रक्रिया मोठी माणसे काहीशा नाखुशीने सहन करून घेत असली, तरी लहान मुलांच्या बाबतीत मात्र की प्रक्रिया त्रासाची ठरू शकते. त्याचप्रमाणे शरीराच्या कुठल्याही भागावर शस्त्रक्रिया करायची झाल्यास तिथेही त्वचेवर ‘कट’ दिला जात असतो. असे ही घाव मागून जोडण्यासाठी टाके घातले जातात. हे टाके कधी सुकल्यावर काढून टाकायचे असतात, तर शरीराच्या आतील अवयवांवर असणारे टाके आपोआप विरघळणारे असतात.

पण आता टाके घालण्याच्या आणि टाके घालून घेण्याच्या ह्या कामाला अजिबात फाटा देत, शास्त्रज्ञांनी एक नवीन जेल किंवा ‘ग्लू’ शोधून काढले आहे. जे जेल किंवा ‘ग्लू’ घावावर लावताच काही वेळातच जखम आपोआप सील होऊन जाते आणि घाव भरून येतो. त्यामुळे टाके घालण्याची प्रकिया न करताच घाव भरून येणे शक्य होणार आहे.

अमेरिकेतील बायोमेडिकल शास्त्रज्ञ आणि सिडनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे सर्जिकल ग्लू तयार केले गेले असून ह्या ग्लूला त्यांनी ‘मेट्रो’ असे नाव दिले आहे. हे इलास्टिक आणि त्वचा जोडणारे ग्लू घावावर लावल्यानंतर साठ सेकंदांमध्ये घाव भरून येऊन जखम सील होऊन जाते. ह्या ग्लूच्या वापरामुळे आता लहान घावांसाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी त्वचेवर दिलेल्या कट वर टाके घालण्याची गरज भासणार नाही. ह्या ग्लूमधील जेल सम दिसणारा पदार्थ घावावर लावल्यानंतर अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या वापराने हे जेल ‘अॅक्टीव्हेट’ केले जाते. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे हे जेल संपूर्णपणे विरघळून घाव व्यवस्थित सील करते. ह्या ग्लूची जनावरांवर केली गेलेली चाचणी शंभर टक्के यशस्वी झाली असून आता लवकरच मनुष्यांवरही ह्या ग्लूची चाचणी केली जाणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment