स्विस बँकेमध्ये जमा पैशांवर अरूण जेटलींचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – भारतीयांचे स्विस बँकेत असलेल्या पैशात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याच्या वृत्तानंतर केंद्रातील मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. सरकारला विरोधकांनी घेरल्यानंतर सरकारच्या बचावासाठी केंद्रीय मंत्री अरूण जेटली रिंगणात उतरले आहेत. जेटली यांनी स्विस बँकेमध्ये जमा झालेला सर्व पैसा काळा नाही. विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे.

जेटली यांनी यावेळी बोलताना, बेकायदेशीर पद्धतीने स्विस बँकामध्ये पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींना कारवाईला सामोरे जावे लागले. स्वित्झर्लंड सरकारशी केलेल्या करारानुसार सर्व गुंतवणुकदारांची माहिती उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले. स्वीस राष्ट्रीय बँकेच्या अहवालानुसार, २०१७मध्ये बँकेत ठेवलेल्या भारतीयांच्या पैशात चक्क ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर बँकेच्या परदेशी गुंतवणुकीत तीन टक्के वाढ झाली आहे. सरकारने केलेल्या काळा पैसा परत आणण्याच्या वल्गना फोल ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

यादरम्यान केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेस महासचिव अशोक गेहलोत यांनी टीका केली. चार वर्षे काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनात निघून गेली. आधी पैसे देशाबाहेर नेण्यासाठी सरकारने लोकांना मदत केली. त्यानंतर परत आणण्याच्या गोष्टी केल्या जात असल्यामुळे कोणीही या सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment