तुम्ही पहिली आहे का ही ८४ कोटीची कार


शानदार आणि लग्झरी कार निर्मितीसाठी जगभरात नाणावलेली कंपनी रोल्स रॉयसने त्याची आत्तापर्यंतची महागडी कार तयार केली आहे. रोल्स रॉयसच्या कार्स महाग म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र हि नवी कार तब्बल ८४ कोटी रुपये किमतीची असून एका खास ग्राहकाच्या मागणीनुसार ती बनविली गेली आहे. या कारचे नाव आहे स्वेपटेल. अशी कार जगात आत्तापर्यंत कोणाकडेच नाही असे समजते.

या कारमध्ये दिलेली फीचर्स अन्य कोणत्याच कारमध्ये नाहीत. या कार मुळात कस्टमाइज असतात. त्या यंत्रांच्या साहाय्याने नाही तर माणसे हाताने तयार करतात. त्यामुळे एक कार दुसरीसारखी नसते हे यांचे वैशिष्ठ. प्रत्येक कारचे इंटिरियर, रंग वेगळा असतो.

नवी स्वेपटेल एसयूव्ही असून तिला ६.७५ लिटरचे व्ही १२ इंजिन दिले गेले आहे. टायटेनियम घड्याळ, मॅक्केसार इबोनी लाकडाचे काम, पाल्डोवूड इंटिरियर सीट आणि उत्तम दर्जाच्या लेदरचा वापर अशी फीचर्स आहेत आणि ही कार दोन सीटर आहे. कारला पॅनरोमिक मिररवाले सनरुफ दिले गेले आहे. रेसिंग कारवरून प्रेरणा घेऊन ती बनविली गेली आहे.

Leave a Comment