जगातले काही प्रसिद्ध सूसाईड पॉइंट


आयुष्याला कंटाळलेले, निराशेच्या गर्तेत सापडलेले अथवा अपयशाचा सामना करू न शकण्रे, मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेले असे अनेक लोक आत्महत्या करून जीवनाचा शेवट करतात. आत्महत्या कुठेही, कधीही करता येणे शक्य असले तरी जगात काही प्रसिद्ध पर्यटनस्थळे सूसाइड पॉइंट म्हणजे आत्महत्या ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक सर्व ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते तरीही लोक येथे जीव देतात.

नायगारा धबधबा- अमेरिका आणि कॅनडा याच्या सीमेवर असलेला जगप्रसिद्ध धबधबा नायगारा आत्महत्येसाठीही प्रसिद्ध आहे. हा धबधबा निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानला जातो आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. १८५६ पासून १९९५ पर्यंत येथे २७८० लोकांनी जीव दिल्याचे आकडेवारी सांगते. हा आकडा आणखी मोठा असू शकतो.

कॉलोराडो स्ट्रीट पूल- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील कॉलोराडो स्ट्रीट पूल हा १५०० फुट लांबीचा पूल अतिशय देखणा आहे मात्र अनेकांनी येथून जीव देऊन जीवन संपविले आहे. १९१३ साली हा पूल बांधला गेला. दरवर्षी सरासरी १० लोक तरी येथून उडी घेऊन जीव देतात.


माउंट मिहारा जपान- जपान हा मुळातच ज्वालामुखीचा प्रदेश. येथील प्रसिद्ध ज्वालामुखी माउंट फुजीयामा आता मृत ज्वालामुखी आहे आणि जपानी लोकांच्या मनात त्याला देवाचे स्थान आहे. जपानच्या ओशिमा प्रांतात असलेला जागृत धगधगता ज्वालामुखी माउंट मिहारा आत्महत्या करण्याचे लोकांचे आवडते ठिकाण आहे. या धगधगत्या आगीत उडी मारून लोक जीव देतात. १९३३ या वर्षात येथून विक्रमी ९४४ लोकांनी जीव दिला होता.

गोल्डन गेट ब्रिज हा अमेरिकेच्या सानफ्रान्सिस्को राज्यातील पर्यटकांचा आवडता पूल. येथे बारा महिने पर्यटकांची वर्दळ असतेच. आणि तेथून जीव देणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आत्तापर्यंत येथून १६०० जणांनी जीव दिल्याची नोंद झाली आहे.

बीची हेड ब्रिटन- ब्रिटनच्या इस्ट ससेक्स कौंटी मधील इस्टबोर्न टाऊन मधील या बीची हेड वरून अनेक लोक उडी मारून जीव देतात. येथून उडी मारली कि हमखास जीव जातो असे सांगितले जाते. दरवषी किमान २० लोक येथून उडी घेऊन आत्महत्या करतात असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment