नव्या रंगात ८ जीबी रॅॅमचा वनप्लस ६ भारतात सादर


वनप्लस सिक्स मे महिन्यात भारतात सादर झाला तेव्हा कंपनीने ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजचे लिमिटेड एडिशन व्हर्जन सादर केले होते. त्याला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेऊन या फोन पेक्षा १ हजार रु. स्वस्त असे नवे व्हेरीयंट कंपनीने भारतात लाँच केले आहे. मिडनाईट ब्लॅक रंगातील हे व्हेरीयंत १० जुलै पासून अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनची किंमत आहे ४३९९९ रुपये.

या मॉडेलचा टॉप एंड व्हेरीयंट मिडनाईट ब्लॅक रंगात १४ जुलैपासून वनप्लस डॉट इन तसेच देशभरातील वनप्लस ऑफलाईन स्टोर्स मध्ये मिळू शकणार आहे. या फोनला ६.१८ इंची फुल एचडी स्क्रीन गोरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. व्हर्टीकल डूअल रिअर कॅमेरा असून हे कॅमेरे १६ आणि २० एमपीचे आहेत. डूअल एलईडी फ्लॅश दिला गेला असून फ्रंट कॅमेरा १६ एमपीचा आहे.

Leave a Comment