कोकाकोला एनर्जी ड्रिंक हॉर्लीक्सची खरेदी करणार


कोकाकोला भारतात एनर्जी ड्रिंक हॉर्लीक्सच्या खरेदीच्या तयारीत असून सध्या हा ब्रांड जीएसके कन्झ्युमरकडे आहे. कोकाकोला या निमित्ताने न्युट्रीशन व्यवसाय स्पर्धेत उतरत आहे. यापूर्वी कोकाकोलाने १९९० साली पार्लेच्या थम्सअपची खरेदी केली असून त्यानंतर भारतात त्यांची ही दुसरी मोठी खरेदी ठरणार आहे. हॉलिक्स खरेदीत कोकाकोलाला नेसले, डेनॉन व हिंदुस्तान युनिलिव्हरबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.

भारतीय कंपनी जीएसके पीएलसीची जीएसके कन्झ्युमर मध्ये ७२ टक्के भागीदारी आहे आणि हॉर्लीक्स, बुस्ट, विवा हे त्यांचे ब्रांड आहेत. जीएसकेला नोवार्टिस खरेदीसाठी ८८ हजार कोटी रुपये हवे आहेत आणि त्यासाठी हे ब्रांड विकले जाणार आहेत. कोकाकोलाने भारतात २०२० अखेर ३४ हजार कोटी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले असून त्या दृष्टीने जीएसके चे मुल्यांकन केले जात आहे. १९९० च्या कोकाकोलाच्या थम्सअप खरेदीतून त्यांना बॉटलिंग आणि वितरण सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या. तसेच कोकाकोलाने नवीन प्रोडक्ट लाँच करण्याची तयारी चालविली असल्याचे कंपनीने यापूर्वीच जाहीर केले आहे.

Leave a Comment