सुंदर नितळ त्वचेसाठी ‘चारकोल मास्क’


आकर्षक चेहरा, मुलायम चमकदार केस, आणि सुंदर नितळ त्वचा असावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. त्यासाठी अनेक तऱ्हेची सौंदर्य प्रसाधने, ब्युटी थेरपीज ह्यांचा वापर आपण करीत असतो. अनेकदा नितळ त्वचेसाठी रासायनिक उत्पादनांचा वापरही केला जातो. पण अश्या उत्पादनांच्या वापराने त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याकरीता नैसर्गिक तत्वांचा वापर करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. त्वचेचे सौंदर्य वापरण्यासाठी ज्या ब्युटी थेरपीजचा वापर होतो त्यापैकी एक आहे ‘चारकोल मास्क’. ह्या मास्कचे त्वचेसाठी अनेक लाभ आहेत.

अॅक्टीव्हेटेड चारकोल किंवा कोळसा, सामान्य कोळशाच्याप्रमाणेच असून, ह्यातील पोषक तत्वांचा लाभ मिळविण्याकरिता ह्या कोळशाच्या भुकटीला गरम केले जाते. हा चारकोल त्वचेतील हानिकारक द्रव्ये, कीटाणू बाहेर काढण्यास मदत करतो. त्यामुळे ह्याचा वापर ‘ क्लेन्जिंग मास्क ‘ म्हणून केला जातो. ह्यातील प्रभावी क्लेन्जिंग तत्वांच्या मदतीने त्वचेवर उत्पन्न होणारी मुरुमे, पुटकुळ्या, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स इत्यादी हटविण्यासाठी ह्या चारकोलचा उपयोग अनेक मास्क्स मध्ये केला जात असतो. ह्या चारकोलचा वापराने त्वचेशी निगडीत समस्या नैसर्गिक पदार्थांच्या सहायाने बऱ्या करणे शक्य होते. तसेच मुरुमे पुटकुळ्या चारकोलच्या मदतीने ठीक करताना ह्याचे डाग ही चेहऱ्यावर न राहता त्वचा नितळ, सुंदर होते.

चारकोल मास्क विशेषकरून तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असून, त्वचेतील अतिरिक्त ‘सीबम’ हा मास्क अवशोषित करून घेतो. त्वचेवरील मृत पेशी हटविण्यासही हा मास्क सक्षम असून, ह्याच्या वापराने दात शुभ्र चमकदार होऊ शकतात. तसेच मानेवरील आणि बगलांमधील काळसर झालेली त्वचा उजळण्यासाठी ह्या मास्कचा उपयोग केला जाऊ शकतो.

Leave a Comment