१ जुलै जीएसटी दिवस म्हणून साजरा होणार


यंदाच्या १ जुलैला भारतात जीएसटी लागू झाल्याला वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकार १ जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून देशभरात साजरा करणार असून या दिवशी दिल्लीत आंबेडकर भवन येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. हि करप्रणाली देशात अत्यंत उपयुक्त ठरली असल्याचे अर्थ विभागाचे सचिव हसमुख अथिया यांनी सांगितले. ते म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल हजर राहणार आहेत तर अर्थमंत्री अरुण जेटली व्हिडीओच्या माध्यमातून संपर्कात राहणार आहेत.

स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणावर कार सुधारणा झालेली प्रणाली म्हणून जीएसटीकडे पहिले जात आहे. हसमुख अथिया याविषयी बोलताना म्हणाले सुरवातीला यात कोणत्याही बदलानंतर येतात त्या अडचणी आल्या मात्र आता हि करप्रणाली देशात चांगली रुजली असून तिचे फायदे दिसू लागले आहेत. ३० जून च्या मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याच्या हस्ते आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हे करप्रणाली संसदेत सादर केली गेली होती. म्हणजे १ जुलैपासून ती लागू झाली. सध्या १.११ कोटी व्यावसायिकांनी जीएसटीखाली नोंदणी केली असून लवकरच हे प्रमाण ९६ टक्क्यावर जाईल. या प्रणालीमुले जकात बंद झाली तसेच करांची संख्या कमी झाली. यामुळे करदात्यांना आधार मिळाला आहे.

Leave a Comment