आयफोन क्रेझींसाठी येतोय स्वस्त आयफोन एक्स


आयफोन एक्सची क्रेझ स्मार्टफोन युजर मध्ये कितीही असली तरी त्याची किंमत हा खरेदीतील मुख्य अडथळा ठरला आहे. मात्र आता सर्वसामान्य युजरही आयफोन खरेदीची त्याची हौस भागवू शकणार आहे कारण अॅपल लवकरच आयफोनची तीन नवी मॉडेल बाजारात आणत असून त्यातील आयफोन एक्स सारखे दिसणारे मॉडेल सर्वसामान्य युजरना परवडणारया किमतीत उपलब्ध केले जाणार आहे. फोर्ब्स मध्ये या संदर्भात खुलासा केला गेला आहे.

लिक झालेल्या माहितीनुसार सप्टेंबर मध्ये अॅपल तीन आयफोन बाजारात आणत आहे. त्यातील एक आयफोन एक्सप्रमाणे दिसणारा आहे. त्याला एलसीडी डिस्प्ले असेल. या तिन्ही फोनसाठी नॉच असेल आणि फ्रंट पॅनलवर फिजिकल बटण असणार नाही. नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा व अन्य सेन्सर असतील. डावीकडे पॅनलवर व्हॉल्यूम कंट्रोल व म्युट बटण असेल. बॅक पॅनलवर सिंगल कॅमेरा आणि खाली युएसबी पोर्ट दिले जाईल.

आयफोन एक्ससारख्या दिसणाऱ्या आयफोनला ६.१ इंची स्क्रीन दिला जाईल तर अन्य दोन फोनसाठी ६.५ व ५.८ इंची स्क्रीन असतील. हे फोन ३ जीबी रॅम सह येतील.

Leave a Comment