शतकातले सर्वात दीर्घ खग्रास चंद्रग्रहण २७ जुलैला होणार


चालू म्हणजे २१ व्या शतकातले सर्वात अधिक काळ दिसणारे खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलैला होणार असून ते भारताबरोबरच युरोप, ऑस्ट्रेलिया, द.अमेरिका, आफ्रिका आणि प.आशियात दिसणार आहे. हे ग्रहण तब्बल १ तास ४३ मिनिटे असून या ग्रहणाला संशोधकांनी ब्लड मून असे नाव दिले आहे. यावेळी पावसाळी ढगांनी आकाश व्यापलेले नसेल तर ग्रहणाचा सुंदर नजारा पाहता येणार आहे. ३१ जानेवारी २०१८ ला सुपर ब्लड मून चंद्रग्रहण झाले होते त्यापेक्षा हे ग्रहण ४० मिनिटे अधिक दिसणार आहे.

या ग्रहणात खग्रास स्थिती असूनही चंद्र पूर्ण काळा दिसणार नाही तर तो तांब्याचा रंगाचा दिसेल. म्हणजे लालसर दिसेल. चंद्र्ग्रह्णात पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्रावर पडते. ब्लड मून मध्ये पृथ्वी चंद्र सूर्याच्या मध्ये आल्यावरही वातावरणातून काही प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो चंद्र लालसर दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या मागे लपतो तेव्हा तो गडद लालसर होतो.

Leave a Comment