भारतात फक्त जॉन अब्राहमकडे आहे यामाहाची पॉवरफुल बाईक


बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जॉन त्याची दमदार बॉडी आणि त्याला शोभणारी स्टाईल यासाठी प्रसिद्ध आहे तसेच त्याच्या बाईक वेडासाठीही ओळखला जातो. अनेकदा भर रस्त्यातून त्याला बाईकवरून जाताना अनेकांनी पहिले आहे. जॉन कडे अशी एक बाईक आहे जी संपूर्ण भारतात फक्त त्याच्याकडेच आहे. या बाईकचे नाव यामाहा १७०० सीसी व्ही मॅक्स असे असून कंपनीने ६० व्या वर्धापनदिनानिम्मित हि खास बाईक बनविली होती. जॉन या यामाहाचा ब्रँड अँबेसिडर असल्याने हि बाईक त्याच्याकडे आहे.

या बाईकला १६८९ सीसीचे चार सिलेंडर इंजिन ५ स्पीड गिअर बॉक्ससह दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग हि बाईक केवळ २.७ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी २२१ किमी. या बाईकला अॅलॉय व्हील्स, डूअल हायड्रोलिक पॉवर ब्रेक, १५ लिटर इंधन टाकी दिली गेली आहे. या बाईकची एक्स शो रूम किंमत आहे २९ लाख रुपये.

Leave a Comment