गुगलचे ‘फर्स्ट डांसिंग गर्ल’ गौहर जान यांना अभिवादन


नवी दिल्ली – गुगलने गायक आणि नृत्यांगणा गौहर जान यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त डुडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. गौहर या देशातील पहिल्या गायक आहेत ज्यांचे गाणे ७८ आरपीएम या वेगाने रेकॉर्ड केले होते. जे नंतर प्रसिद्ध अशा ग्रामोफोनवर वाजवले होते.

२६ जून १८७३ मध्ये गौहर जान यांचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये झाला. एंजेलिना येवर्ड असे त्यांचे मुळ नाव आहे. जन्माने भारतीय असलेली तिची आई व्हिक्टोरिया हेमिंग्ज या उत्तम गायक आणि नृत्यांगणा होत्या. व्हिक्टोरिया यांनी आपल्या पतीबरोबर घटस्फोटानंतर मुस्लीम धर्मातील खुर्शीद यांच्यासोबत बनारसमध्ये राहायला गेल्या. एंजेलिना ही त्यावेळी केवळ ८वर्षांची होती.

आई आणि मुलीने बनारसमध्ये गेल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला. व्हिक्टोरियाने त्यांचे नाव मल्का जान असे ठेवले, तर एंजेलिनाचे नाव बदलून गौहर जान करण्यात आले. बनारसमध्ये गायक आणि कथ्थक नृत्यांगना म्हणून मल्का जान यांनी भरपूर नाव कमावले. त्यानंतर २ वर्षांनी मल्का जान आणि गौहर कोलकाता येथे स्थलांतर केले. तिथे त्यांनी नवाब वाजिद अली शाह यांच्या न्यायालयात काम करायला सुरुवात केली.

गौहर यांनी कोलकात्यात आपले प्रशिक्षण सुरू केले आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, किर्तन आणि रवींद्र संगीत यामध्ये त्या प्राविण्य मिळवले. त्यांना शास्त्रीय संगीताच्या पटियाला घराण्याचे संस्थापक सदस्य कलू उस्ताद, रामपूरचे उस्ताद वाझीर खान आणि उस्ताद अली बक्षी यांनी प्रशिक्षण दिले. गौहर जान यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरवले. तर चरण दास यांच्याकडून किर्तन शिकले. गौहर यांनी १८८७ मध्ये पहिल्यांदा दरभंगा राजमध्ये काम केले. तर १९९६ मध्ये त्यांनी कोलकात्यात अभिनयही करणे सुरू केले. प्रथम नृत्यांगणा म्हणून त्यांच्या रेकॉर्डला नाव देण्यात आले आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला असून अनेक शहरांमध्ये काम केले. दिल्ली दरबारमध्ये राजा जॉर्ज व्हरच्या राज्याभिषेकासाठीही त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. आपल्या अखेरच्या दिवसांत, कृष्णा राजा वाडीयार चौथाच्या निमंत्रणावर गौहर जान मैसूरमध्ये दाखल झाल्या. १७ जानेवारी १९३० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Comment