पतंजली युके आणि ब्रिटनमध्ये सुरु करणार उत्पादन प्रकल्प


योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेदने विदेशात पाय रोवण्याचा विचार पक्का केला असून लवकरच युके आणि ब्रिटन मध्ये कंपनीचे उत्पादन प्रकल्प सुरु होणार आहेत. सध्या लंडनच्या दौऱ्यावर असलेले योगगुरु रामदेवबाबा यांनी हि माहिती दिली. रामदेवबाबा याचे योगशिबीर सध्या येथे सुरु असून जागतिक योगदिनानिमित्त यंदा लंडन येथे हे शिबीर तीन दिवस सुरु आहे. मंगळवारी त्याचा शेवटचा दिवस आहे.

यावेळी बोलताना रामदेवबाबा म्हणाले, युरोपीय बाजारात पतंजलीची १४० उत्पादने सध्या विकली जात आहेत. आम्हाला येथेच उत्पादन सुरु करावे यासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत. युके च्या बाजारात पतंजली उत्पादनांची मागणी वेगाने वाढत आहे. अर्थात भारतापेक्षा येथले नियम वेगळे आहेत. येथील नियम आणि कायदे जाणून घेऊन त्यानुसार येथे उत्पादन प्रकल्प उभारण्याचा आमचा विचार आहे.

Leave a Comment