तुम्हाला माहिती आहे, रॉयलएनफिल्डची स्कूटर?


रॉयल एन्फिल्डचे नुसते नाव घेतले कि नजरेसमोर दमदम बुलेट उभ्या राहतात. मात्र या बाईक उत्पादन करणाऱ्या कंपनीने स्कूटर क्षेत्रातही प्रवेश केला होता याची माहिती फार जणांना नाही. १९६२ मध्ये या कंपनीच्या स्कूटर भारतीय दुचाकी बाजारात आल्या होत्या. लँब्रेटा स्टाईलने या स्कूटर तयार केल्या गेल्या होत्या मात्र त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता लाभली नाही आणि अखेरी हे उत्पादन कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला.

कंपनीने वास्तविक स्कूटर बनविण्याचा प्रोजेक्ट १९४० साली सुरु केला होता मात्र तो पूर्ण झालाच नाही. त्यानंतर २० वर्षाने कंपनीने त्यांची स्कूटर फँटाबुलस नावाने बाजारात आणली. हि स्कूटर चेन्नईच्या उत्पादन प्रकल्पात बनविली गेली होती. स्कूटर दिसायला फँटास्टीक आणि किमतीला फॅब्युलस होती आणि त्यामुळे तिचे नामकरण फँटाब्युलस असे केले गेले होते. या स्कूटरला १७५ सीसीचे दोन स्ट्रोक इंजिन दिले गेले होते आणि त्यावेळी मोटारबाईकमध्येही नसलेले सेल्फ स्टार्ट फिचर या स्कूटर मध्ये होते. मात्र बाजारात हि स्कूटर ग्राहकांची पसंती मिळवू शकली नाही त्यामुळे तिचे प्रोडक्शन बंद झाली.

कंपनीने ही स्कूटर लंडनच्या १९६८ मधल्या अर्ल्स कोर्ट मोटारसायकल शो मध्ये शोकेस केली होती असेही समजते.

Leave a Comment