बंद होणार मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सुविधा ?


मुंबई : दिवसेंदिवस टेलोकॉम कंपन्यांमधील सुरू असलेले प्राईज वॉर वाढत असून अनेकजण चांगल्या ऑफर्स, अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंगचे स्वस्त दर याचा फायदा मिळवण्यासाठी नंबर पोर्टबिलिटीचा फायदा घेत आहे. सध्या नंबर पोर्टबिलिटीची सुविधा बंद करण्यात आली असून ग्राहकांना मार्च २०१९ पासून मोबाईल नंबर बदलायचा झाल्यास कंपनीदेखील बदलावी लागणार आहे.

याबाबत इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाईल नंबर पोर्टबिलिटीसाठी काम करणारी एमएनपी इंटरकनेक्शन टेलीकॉम सॉल्यूशन्स आणि सिनिवर्स टेक्नोलॉजी तोट्यात असून पोर्टिंग फीमध्येही जानेवारी महिन्यापासून ८०% कपात केल्याने त्यांना सतत तोटा होत आहे. ज्या कंपन्यांचे लायसन्स मार्च २०१९ महिन्यात संपत असल्याने ही सेवा बंद होणार आहे.

पोर्टबिलिटीची सुविधा बंद पडल्याने ग्राहकांनाच त्याचे नुकसान होणार आहे. कॉलिंग़ रेट, टेरिफ रेट याबाबत ग्राहकांच्या सतत समस्या असतात. यावर सर्व्हिस प्रोव्हायडर बदलणे हा सोपा उपाय होता. पण सर्व्हिस कंपन्यांनी त्यांचे लायसन्स रिन्यू न झाल्यास त्याजागी पर्याय शोधावा लागणार आहे. त्याद्वारा मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची सुविधा पुढेही लागू केली जाऊ शकते.

Leave a Comment