डासच देणार मलेरियापासून मुक्ती


जगप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी अनेक संशोधन प्रकाल्पनासाठी मोठी गुंतवणूक केल्याचे आपण जाणतो. जगासाठी धोकादायक ठरलेल्या मलेरिया या रोगापासून मुक्ती देण्यासाठी जे नवीन संशोधन सुरु आहे त्यासाठीही गेट्स यांनी २५ कोटींची गुंतवणूक केली असून यात मलेरियापासून मुक्ती देण्यासाठी डासांचाच उपयोग केला जाणार आहे. म्हणजे लोहा लोहेको कटात है या म्हणीप्रमाणे मलेरियाच्या डासांचे निर्मुलन डासांकडूनच केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युकेची ऑक्सिटिक नावाच्या कंपनीने डासांच्या अनुवांशिक जीनमध्ये बदल करून नवे डास तयार करण्यात यश मिळविले आहे. या तंत्रानुसार हे नवे डास जेव्हा डासाच्या मादीबरोबर समागम करतील तेव्हा हे जीन त्या मादीच्या शरीरात सोडले जाईल व त्यातून जे नवे डास जन्माला येथील ते काही वेळात अपोआप मरुन जातील. मादी डास चावल्याने मलेरिया पसरतो. आणि जगात दरवर्षी १० कोटी लोक मलेरियाने मारतात. त्यात लहान मुलांची संख्या अधिक असते. दरवर्षी ६० कोटी लोकांना मलेरियाची लागण होते असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment