फेसबुकचे व्यसन सोडविण्यास आता फेसबुकच करणार मदत


फेसबुकचे व्यसन लागलेल्या आणि ते व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी खुशखबर! फेसबुकवर अधिक वेळ घालविण्यापासून लोकांना सोडविण्यासाठी खुद्द फेसबुकने आता एक नवीन साधन आणले असून लवकरच ते सर्व वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.

‘युवर टाइम ऑन फेसबुक’ असे या फिचरचे नाव ठेवण्यात आले असून आठवड्यातील प्रत्येक दिवशी एखादा वापरकर्ता फेसबुकवर किती वेळ घालवतो, हे या फीचरमुळे कळणार आहे. तसेच एखादी व्यक्ती फेसबुकवर दररोज सरासरी किती तास असते हेही या साधनामुळे कळणार आहे. या फिचरमध्ये वापरकर्त्यांना दररोज आपली वेळेची मर्यादा निर्धारित करता येणार आहे. तसेच फेसबुकच्या सूचनाही (नोटिफिकेशन) नियंत्रित करता येणार आहेत, असे ‘टेक क्रंच’ या संकेतस्थळाने म्हटले आहे.

“लोकांनी फेसबुकवर घालवलेला वेळ चांगल्या प्रकारे जावा हे निश्चित करण्यासाठी मदत करण्याकरता नवीन मार्ग शोधण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो,” असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

Leave a Comment