१० लाख रुपये प्रतिलिटरमध्ये मिळणाऱ्या या खेकड्याचे रक्त मानवासाठी आहे अमृत


मेडिकल सायन्‍समध्‍ये पाण्‍यामध्‍ये आढळणारा हॉर्स-शू खेकड्याचे रक्‍त अमृत समजले जाते. निळ्या रंगाचे हे रक्‍त असते. पण याच वैशिष्‍टयामुळे या प्राण्‍याला मोठ्या प्रमाणात मारले जाते हे दुर्दैव आहे. घोड्याच्‍या नाळेसारखा हा जीव दिसतो म्‍हणून याला हॉर्स शू क्रॅब म्‍हटले जाते.

Limulus polyphemus असे या खेकड्याचे वैज्ञानिक नाव असून ही प्रजाती ४५ कोटी वर्षांपासून अस्तित्‍वात असल्‍याचे म्‍हटले जाते. पण या जीवामध्‍ये कोणताही बदल तेव्‍हापासून झाला नाही. अँटी बॅक्‍टोरिअल गुणधर्मामुळे मेडिकल सायन्समध्‍ये याचे रक्‍त मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

हॉर्स शू क्रॅबचे रक्‍त निळे असण्‍याचे कारण म्‍हणजे याच्‍या रक्‍तात कॉपर बेस्‍ड हीमोस्याइनिन असते, ज्‍याचे काम संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्‍याचे असते. इतर सजीवांमध्‍ये हीमोग्‍लोबिनसोबत लोह हे काम करते. यामुळे त्‍यांचे रक्‍त लाल असते.

या खेकड्याच्‍या रक्‍ताचा उपयोग शरीरातील इंजेक्‍ट होणा-या औषधांमधील धोकादायक बॅक्‍टेरिया ओळखण्‍यासाठी केला जातो. या रक्‍ताद्वारे धोकादायक बॅक्‍टेरियाबाबत अचुक माहिती दिली जाते. औषधांमधील धोकादायक घटकांबाबत यामुळे आपल्‍याला माहिती मिळते. या रक्‍ताची किंमत याच खास वैशिष्‍ट्यामुळे जवळपास १० लाख रुपये प्रति लिटर एवढी आहे. दरवर्षी ५ लाखापेक्षा अधिक खेकड्यांचे अशाप्रकारे रक्‍त काढले जाते.

Leave a Comment