गुंडांचे गँगवॉर आता फेसबुक, ट्वीटर आणि व्हाट्सअपवर!


आपल्या टोळीची दहशत बसविण्यासाठी उत्तर भारतातील गुंडांनी आता सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरू केली आहे. खंडणी आणि धमक्या यासाठी त्यांनी फेसबुक, ट्वीटर आणि व्हाट्सअप यांसारख्या साधनांचा वापर सुरू केला आहे. अनेक टोळ्यांच्या प्रमुखांनी व्हाट्सअपवर व्हिडियो कॉल करून आणि ऑडियो-व्हिडियो पाठवून खंडणी मागितली आहे.

दिल्लीत नुकतेच चकमकीत मारले गेलेले क्रांति गँगचे म्होरके राजेश भारती कंडेला, संजीत बिदरो आणि संपत नेहरा हे सोशल मीडियावरूनच खंडणी मागत होते, असे आज तक वाहिनीने म्हटले आहे.

चकमकीत मारले गेलेल्या गुंडाकडून हस्तगत केलेल्या मोबाईलमधून दिल्ली पोलिसांनी ही माहिती मिळाली. राजेश आणि त्याचा साथीदार संजीत बिदरो हे आपली छाप पाडण्यासाठी यू ट्यूबवही व्हिडियो टाकत होते, असे तपासात आढळले.

हरियाणा, पंजाब आणि राजस्थानात दहशत माजविणाऱ्या लॉरेंस बिश्नोई टोळीचा सध्याचा प्रमुख संपत नेहरा याला पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याच दिवशी त्याने याची माहिती फेसबुकवर टाकली. तसेच संपतला चकमकीत मारण्याची भीतीही त्याने व्यक्त केली.

या सर्व गुंडांच्या फेसबुकवर आठ ते दहा आयडी आहेत. फेसबुकवरील एखादी आक्षेपार्ह पोस्ट किंवा आयडी काढून टाकण्यासाठी पोलिसांनी कॅलिफोर्नियामधील फेसबुकच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे या गुंडांचे फावते.

Leave a Comment