३१ जुलै ९५ ला भारतात केला गेला पहिला मोबाईल फोन


मोबाईलच्या वापराने संदेश दळणवळण दुनिया अमुलाग्र बदलली गेली त्याला आता २० वर्षांचा काळ लोटला आहे. अर्थात युजर अजुनी खराब कनेक्टिव्हिटी मुळे नाराज असले तरी त्यावरही आता वायफाय नेटवर्क व्हॉइस कॉलचा उपाय हाताशी आला आहे. म्हणजेच सीम बरोबर वायफाय इंटरनेट कॉलहि करता येणार आहेत.

भारतात पहिला मोबाईल कॉल कधी आणि कुणी केला याची माहिती अनेकांना नसेल. भारतात सर्वात पहिला इंटरनेट कॉल ३१ जुलै १९९५ ला केला गेला होता. हा कॉल प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकाता येथून तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला होता. कोलकात्याच्या रॉयटर बिल्डींग मधून दिल्लीच्या संचारभवनात हा कॉल कनेक्ट केला गेला होता. मोदी टेल्सट्रा मोबाईल नेट सर्विसच्या माध्यमातून हा कॉल केला गेला होता.

जगाचा विचार केला तर पहिला मोबाईल कॉल मोटोरोलाचा कर्मचारी मार्टिन कुपर याने ३ एप्रिल १९७३ रोजी केला होता. सुरवातीला मोबाईलचा येणाऱ्या आणि जाणारया दोन्ही कॉल साठी चार्ज लागत असे आता इनकमिंग कॉल फ्री मिळत आहेत आणि मोबाईल कंपन्यानी स्पर्धेमुळे कॉल दर, भाडे दर हि कमीत कमी ठेवण्याच्या प्रयत्न केला आहे.

Leave a Comment