फेरारी बनविणार ४८८ पिलोटीचे युनिक व्हर्जन


फेरारी त्यांच्या ४८८ पिस्टाचे युनिक व्हर्जन पिलोटी लाँच करणार असून हि कार जगातील सर्वात जुनी अॅक्टीव्ह रेस कार २४ हॉर्स ऑफ लेमंस मध्ये लाँच केली जाणार आहे. ही कस्टम कार फेरारी रेस कार चालविणाऱ्या ग्राहकाच्या यशाची ओळख देण्याच्या दृष्टीने डिझाईन केली जात आहे.

ही युनिक कार २०१७ एफआयए वर्ल्ड इनड्यूरन्स चँपियनशिप जिंकणाऱ्या ५१ नंबर कारवरून प्रेरणा घेऊन बनविली जात आहे. तसेच ती फक्त कंपनीच्या मोटर स्पोर्ट्स प्रोग्रामशी संबंधित लोकांना उपलब्ध होणार आहे असे सांगितले जात आहे. या कारला ३.९ लिटरचे टर्बोचार्ज्ड व्ही ८ इंजिन दिले गेले असून या इंजिनाला २०१८ साली सलग तिसऱ्यांदा जगातले बेस्ट इंजिन म्हणून निवडले गेले आहे.

कारच्या बाहेरच्या बाजूला स्ट्रिप्स असून त्यांना इटलीच्या ध्वजाचा रंग दिला गेला आहे. चँपियनशिप लोगो खाली मोकळी जागा असून येथे ग्राहक आपला नंबर लिहू शकणार आहे. चार रंगात हि कार उपलब्ध केली जात आहे आणि कारचे भाग कार्बन फायबर पासून बनविले गेले आहेत.

Leave a Comment